रेहनुमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळ्यातील कब्रस्तानात स्वच्छता
करमाळा समाचार
करमाळ्यातील रेहनुमा चॅरीटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने मुस्लिम कब्रस्तान (आनंद बाग ) जवळील काटेरी झुडपे काढणे, वाळून गेलेले गवत काढणे, पाऊल वाटांची स्वच्छता केली. या मोहिमेअंतर्गत कब्रस्तान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हाजी कलीम काझी सर,बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण संस्थेचे सचिव सुरज शेख, रहेबर फौंडेशन चे अध्यक्ष ईमत्याज भाई पठाण, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख, अल्लाबकश शेख, मौलाना सिकंदर शेख, रेहनुमा चे सदस्य मुस्तकिन पठाण, राजू सय्यद ,जमीर बागवान, इन्नुस पठाण , तोफिक शेख,अमीन बेग ,राजू सय्यद, गुलाम सय्यद, अलीम सय्यद, इक्बाल शेख, सुलतान शेख आदि उपस्थित होते.
