करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

योगायोग – स्व. जगतापांचे निकटवर्तीय तात्यांच्या अंतीमक्षणी साहेबांच्या नातवाकडुन उतराई

करमाळा समाचार 

बसचा बिघाड व दगदग यामुळे त्रास होऊन आपल्या वैयक्तिक कामानिमित्त पुणे येथे जात असताना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी भीमराव ननवरे (वय ६८) रा. गुळसळी ता. करमाळा हे बस मध्ये मयत झाले आहेत. ते माजी आमदार स्व. नामदेवराव जगताप यांचे अत्यंत्य निकटवर्तीय होते. विशेष म्हणजे साहेबांच्या अंतीमक्षणी ते साहेबांसोबतच होते तर ननवरेंच्या अंतीमक्षणी साहेबांचे नातु पृथ्वीराज सोबत होते.

शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करमाळा पुणे या बसने भीमराव (तात्या) ननवरे इतर प्रवाशांसह निघाले होते. रस्त्यात जात असताना तालुक्यातील कोर्टी येथे सव्वा सहाच्या दरम्यान सदरची बस बंद पडली. त्यानंतर तासाभरानंतर करमाळा येथून दुसरी करमाळा मुंबई बस आली व त्या बसने प्रवासी पुढे पाठवले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पाटस पर्यंत गेल्यानंतर ननवरे यांना त्रास होऊ लागला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

politics

यावेळी बस मध्ये असलेल्या पृथ्वीराज चिंतामणी जगताप या युवकाने त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा वापर करीत ननवरे यांना सिपीआर दिले पण त्याने प्रयत्नही केले परंतु ते अपयशी ठरले. ननवरे तात्काळ त्यांना शेजारच्या दवाखान्यात नेले पण वाचु शकले नाहीत. पुण्याला जाणारी प्रवासी बस वेळेत पोहोचली असती तर मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले नसते.

योगायोग
भिमराव ननवरे हे मुंबई येथे खाजगी नौकरीला असताना त्यांना माजी आमदार स्व. नामदेवराव जगताप यांनी तालुक्यातील होतकरु तरुण म्हणून करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १९८२ ला शिपाई म्हणून नौकरी दिली. ते २०१६ ला निवृत्त झाले या दरम्यान ते जगताप साहेबांसोबत चालक म्हणून असायचे. १९८५ मध्ये जगताप यांना हृदयविकार त्रास होत असताना ते चालक म्हणून त्यांना घेऊन जात होते यावेळी त्यांच्यासोबत पत्नी श्रीमती रत्नप्रभादेवी व स्व. आण्णासाहेब जगताप यांचे दिवंगत चिरंजीव संभाजीराजे सोबत होते. त्यावेळी रस्त्यात जाताना अधिक त्रास होऊ लागला व त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यावेळी अंतीमक्षणी सोबत तर होतेच शिवाय त्यांनी पाणीही पाजले तसाच योगायोग जगताप यांच्या नातवासोबत घडला. ननवरे यांच्या सोबत स्व. जगताप यांचे सुपुत्र बाजारसमितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांचे चिरंजीव पृथ्विराज जगताप होते त्यांनी ननवरे यांना अंतीम क्षणी सी.पी. आर. व पाणीही दिले असा योगायोग पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी जुळुन आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE