करमाळ्यात कोरोना स्थीर तर मृत्युदर २. ४० टक्क्यावर ; आज पर्यत २४४३ एकुण बाधीत
करमाळा समाचार
तालुक्यात सुरुवातीला तब्बल चार महिने एकही रुग्ण आढळला नव्हता. तर आजपर्यंतच्या बाधीतांची संख्या एकूण २४४३ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यात अनेकांना लक्षणे नव्हती तर बऱ्यापैकी रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर आज पर्यंत २३३४ इतके रुग्ण घरी गेले आहेत. तर सध्या बाधीत वाढण्याचे प्रमाण मध्यम गतीने सुरु आहे. तर २. ४० टक्के मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे. सध्या बाधीत वाढण्याचे प्रमाणही मध्यमगतीने चालु आहे.

प्रशासनाच्या वतीने सहा पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे पथक कार्यरत आहेत. वेळोवेळी नागरीकांना तपासणीसाठी प्रवृत्त केले जात आहे तर तपासणी रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत तर केलीच जाते शिवाय अचानक तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचीही तपासणी केली जाते त्यामुळे बाधीत मिळुन येत आहेत. पण लक्षणे दिसल्याशिवाय लोक पोहचत नसल्याने छुपे बाधीत मिळुन येण्यात अडचणी आहेत.
सध्या करमाळा तालुक्यात कोविड केअर च्या माध्यमातून जवळपास ३०० खाटा उपलब्ध आहेत. तर एका खाजगी दवाखाना व उपजिल्हा रुग्णालयात येथे वीस खाटांची सोयही करण्यात आलेली आहे. करमाळ्यात आंबेडकर प्रशालेत तपासणी केली जाते. तर ग्रामीण मध्ये साडे, कोर्टी, केम , जेऊर, वरकुटे या प्राथमीक आरोग्य केंद्रावए तपासणी सुरु आहेत.

करमाळा तालुक्यात आज पर्यत कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजारांच्या पलिकडे गेला असला तरी बरे होणारे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दुर्दैवाने ४८ रुग्णांचा आज पर्यत यात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरी भागातील १७ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. रोजचे प्रमाण वाढत असताना उपचारासाठी चारशे पर्यत पोहचलेली संख्या आज ७२ पर्यत येऊन पोहचली आहे.
आजचे एकुण टेस्ट – 461
एकुण बाधित रुग्ण – 17 (11 पु/ 6 महिला)
शहर – टेस्ट – 98
बाधीत – 4 (3पुरुष 01स्त्री)
S.t.colony – 01 पुरुष
शाहू नगर – 01 स्त्री
बायपास रोड – 01 पुरुष
घोलप नगर – 01 पुरुष
ग्रामीण – टेस्ट – 363
बाधीत – 13 (8 पुरुष/05 महिला)
वरकुटे 1 पुरुष
फिसरे 1 पुरुष
कोर्टी 4 3 पुरुष 1 महिला
जेऊर 6 02 पुरुष 04 महिला
आज सोडले- 12
उपचार -78