करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

40 पैसे गॅंगवर जगताप गटाकडुन पलटवार ; समाजमाध्यमात अर्धवट क्लिप ला पुर्ण विडिओ ने उत्तर

करमाळा समाचार 

मराठा समाज व आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप मध्ये काटछाट करून गरजेपुरती काही सेकंदाची क्लिप वायरल करून जगताप तसेच नारायण पाटील यांना बदनाम करण्याचा डाव काही जातीयवादी लोकांनी आखला होता. त्यांना जगताप यांच्यासह पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. उर्वरित क्लिप पुन्हा एकदा समाज माध्यमात आणून 40 पैसे गॅंगला इशारा दिला आहे.

मागील बऱ्याच काळापासुन समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या अर्धवट व्हिडिओ क्लिप व्हायरल करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनाम केले जात होते. त्यामध्ये भाजपाच्या आयटी सेलचा हात असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले. तेथून आलेले बदनामीकारक काटछाट केलेले व्हिडिओ व्हायरल केले जातात व त्यासाठी आयटी सेल कार्यकर्त्यांना 40 पैसे प्रति व्हिडिओ दिले जातात अशी चर्चाही समाज माध्यमातून करण्यात आली होती. आता त्याच पद्धतीचा प्रकार करमाळा तालुक्यातही झाल्याचा दिसून आला.

महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आमदार जयवंतराव जगताप यांची कंदर येथील सभा सुरू असताना त्या ठिकाणी एक युवक उठला व त्याने मराठा आरक्षणाबाबत ही काही बोला म्हणून जगताप यांना आवाहन केले. यावर जगताप यांना वाटले की मुद्दामून भाषणात खोडा आणण्यासाठी सदर प्रकार केला जात असावा. त्यामुळे जगताप हे स्वतः मराठा आमदार व समाजासाठी कायम लढणारे नेतृत्व असल्याने त्यांनी आपल्या समाजासह सर्वच समाजाच्या हिताचे व काय गरजेचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील अर्धवट क्लिप व्हायरल करत जगताप कसे मराठा द्वेषी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ads

पण या प्रकरणातील संपूर्ण क्लिप समोर आल्यानंतर सगळे चित्र स्पष्ट झाले असून केवळ आणि केवळ जगतापांसह नारायण पाटील यांच्या विरोधात षडयंत्र वाचल्याचे दिसून येत आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमध्ये जशास तसे उत्तर देत संपूर्ण क्लिप वायरल ही केली. पण अशा पद्धतीचे राजकारण ग्रामीण भागापर्यंत पोहोचत चालले आहे हे यातून दिसून येत आहे. करमाळा तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याचे वातावरण असून ते बिघडण्याचा प्रयत्न काही जातीयवादी लोक करत असल्याचे यातून दिसत आहे असा आरोपही करण्यात येत आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE