कोवीड योद्ध्यांना कोरोना लस द्यावी – शिंदे
करमाळा समाचार
कोरोनाच्या काळामध्ये सामाजिक जाणिव ठेऊन जे तरुण कोविड योद्धे म्हणुन काम करत आहेत. त्यांना कोरोनाची लस टोचवुन घ्यावी अशी मागणी करमाळा समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केली.

करमाळा तालुक्यामध्ये करमाळा रावगाव , मांगी , कंदर, केम वीट , पोथरे या गावामध्ये कोवीड हेल्थ केअर सेंटर चालु आहेत. तेथील जे तरूण आपला जीव धोक्यात घालुन सामाजिक भान ठेऊन आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे जे तालुक्यातील कोवीड सेंटर आहेत. त्याठिकाणी काम करणाऱ्या कोवीड योद्ध्यांना कोरोनाची लस टोचवण्यात यावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी अमोल नाळे , विशाल बनकर, मयुर यादल , नाना अनरसे , राहुल कांबळे , भास्कर पवार , पवन पवार , आकाश पवार , अनिस शेख , विनोद बरडे आदी समता सैनिक उपस्थित होते.