डी. वाय. एस. पी. पदी पोस्टींग मिळाल्यानंतर पै. राहुल आवारेंचा जिंतीकरांकडुन सन्मान
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
आज पुणे येथे महाराष्ट्राचा लाडका मल्ल, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, अर्जुनवीर पै.राहुल आवारे यांचे नाशिक येथे सुरु असलेले Dysp प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण झाले आहे. त्यांची पहिली पोस्टिंग पुणे ग्रामीण Dysp पदी निवड झाली त्याबद्दल पै. राहुल आवारे यांचे जिंतीचे युवा सरपंच संग्रामराजे भोसले यांनी सदिच्छ भेट घेतली व पुष्पगुच्छ देवून स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पै.आवारे यांचे वस्ताद गोविंद तात्या पवार, नाना वाघमोडे, शाम ओंभासे, गणेश घोरपडे उपस्थित होते.

पैलवान राहुल आवारे यांनी महाराष्ट्रातील मल्लांसाठी राज्य, राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची प्रेरणा निर्माण केली. राष्ट्रकुल, जागतिक, आशियायी ते ओलिम्पिक पर्यंत मजल मारणे हे महाराष्ट्राच्या मल्लांसाठी स्वप्नवत होते. मात्र, पै.राहुल आवारे यांनी स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने अहोरात्र मेहनत घेऊन महाराष्ट्राचे पैलवान सुद्धा अश्या जागतिक स्पर्धा लढू शकतात व त्यात यश मिळवू शकतात हे सिद्ध केले.

महाराष्ट्र शासनाने राहुल आवारे यांना महाराष्ट्र पोलीस दलात प्रथम दर्जाची नोकरी दिली. गेली एक वर्ष राहुल आवारे नाशिक येथील पोलीस ट्रेनिंग अकादमीत Dysp चे प्रशिक्षण घेत होते. त्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. प्रशिक्षण घेत असताना सुध्दा त्यांनी एशियन चॅम्पियनशिप मध्ये देशाला पदक मिळवून दिले होते. पै.राहुल आवारे आता पुणे ग्रामीण ला प्रशिक्षणार्थी पदभार सांभाळणार आहेत.