गुरुवर्य आनंदयोगी महाराजांचे देहावसान ; दुपारी चार पर्यत अंत्यदर्शन
गुरुवर्य स्वामी आनंद योगी महाराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शारदा आश्रम ठेवले आहे. आत्ता पासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेण्यात येईल. अंत्यविधी चार वाजता होणार आहे.
करमाळा समाचार

गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज हे आजारी होते. सोमवारी पाटील यांना माहिती समजताच त्यांनी उपचार करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे त्यांना स्वतःच्या गाडीत रुग्णालयात घेऊन आले होते. दरम्यान त्यांचे निधन झाले. हे समजताच पाटील गहिवरले. गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचा लव्हे येथे माँ शारदा नावाचा आश्रम होता. येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत होते.

तालुक्यातील लव्हे येथील गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज (वय ७०) यांचे सोमवारी (ता. २३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे ते गुरु होते. त्यांच्या दर्शनासाठी वेगवेळ्या ठिकाणावरुन सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकजण येतं.
शारदा आश्रम लव्हे येथे शारदीय नवराञोउत्सोवानिमित्त झालेल्या अनेक कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील हजर असत. स्वामी आनंदयोगी महाराज यांच्या एका वाढदिवसानिमित्त साखरतुला करण्यात आली होती. पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी सोशल मीडियाचं माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज स्वामी आनंदयोगी महाराज स्वर्गलोकात विलिन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर त्यांना चिर:काल शांती देवो हीच परमेश्वर चरणी लीन होऊन प्रार्थना.