करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पहिलीत दाखल पात्र विद्यार्थी यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक

करमाळा समाचार

जि प प्रा शाळा उत्तर वडगाव तालुका करमाळा येथे आज शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थी यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शाळेला फुग्यांचे आकर्षक असे डेकोरेशन करण्यात आले.

पहिलीत दाखल मुलांचे औक्षण करून त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्या नंतर शाळेतील विध्यार्थी यांनी पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्यात आली तसेच या शाळेत 1 ते 7 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या व दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याऱ्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला शेवटी मुलांना गोड जेवण देण्यात आले

या कार्यक्रमासाठी या बीट चे विस्तार अधिकारी सन्माननीय श्री टकले साहेब व जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गटकळ सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री संजय रोडगे, उपाध्यक्ष मोसीन शेख तसेच बालाजी अंधारे, प्रशांत भांडवलकर राहुल शिंदे, अनपट मयूर, जोशी आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ ससाणे, श्री मधुकर शिंदे, श्री सुनिल नरसाळे, श्री होनकळसे श्रीमती सुलभा खुळे व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE