दिग्गजांची मदार छानणी वर अवलंबून ; छानणीला सुरुवात संपुर्ण माहीती एकाच बातमीत
Live ६:३० निकाल २२/५/२३ ला जाहीर होणार.
करमाळा समाचार


मकाई सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज आता छाननीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला चिखलठाण व पारेवाडी या ठिकाणी सदरची छानणी सुरवात केली आहे. सर्व अपडेट मिळवण्यासाठी या पेज ला रिफ्रेश करा किंवा बाहेर पडुन पुन्हा बातमी उघडा वेळोवेळी अपडेट आपणा पर्यत कळवले जातील. जे अर्ज बाद होतील त्यांना बोल्ड केले जाईल किंवा बाजुला काढले जाईल . निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे , सहाय्यक विजयकुमार जाधव, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या पुढे सुनावणी सुरु आहे.
पहिली अपडेट वेळ – १२:२२
प्रविण बाबर – भिलारवाडी गट यांच्यावर आक्षेप
- सुचक अनुमोदक यांचेही शेअर रक्कम पुर्ण अपेक्षीत
- अर्जदाराला शेअर रक्कम बंधनकारक
- उस उत्पादक मध्ये सलग तीन वर्ष उस जाणे अपेक्षीत
- मकाई सहकारी साखर कारखान्याची शेअर रक्कम वाढ झाली होती ती यापुर्वी जमा होणे अपेक्षीत होती.
या नियमांच्या आधारावर आक्षेप सुरु आहेत. १२:३० अपडेट.
*मांगी – मध्ये सुभाष शिंदे , विशाल शिंदे, संतोष वाळुंजकर यांच्यावर उस न घातल्याचा आक्षेप.
सध्या ज्यांच्यावर आक्षेप आहेत ते आपली बाजु मांडताना दिसत आहेत. त्यांच्यावतीन वकील बाजु मांडतील त्यावर निवडणुक निर्णय अधिकारी निकाल देतील. (१२:३७ अपडेट)
उपस्थित उमेदवार…
*सध्या महिला राखीव मधुन सवितादेवी राजेभोसले व माया झोळ यांच्यासह इतर दिग्गजांच्या अर्जाची छाननी सुरु आहे.
*breaking सवितादेवींच्या अर्जावर आदिनाथ शेअर्स रक्कमेवरुन आक्षेप
- आक्षेपावर सुनावणी दुपारी तीन वाजल्यापासून होणार. १:१५ लास्ट अपडेट
गटनिहाय उमेदवार*पॅनल प्रमुख सवितादेवी राजेभोसले यांचा अर्ज मंजुर होणार ?*
सर्व उमेदवार हे तहसिल कार्यालया बाहेर ठाण मांडुन बसले आहेत. एक एक गट करुन सर्वांचे सुनावणी होत आहे. निकाल अद्याप कोणाचा जाहीर नाही. (५:३० )
अर्ज छाननी चा निकाल हा राखुन ठेवण्यात आला असुन दि २२ मे ला जाहीर होणार आहे.
चिखलठाण –
सतीश नीळ २ , दिनकर सरडे, नंदकुमार पाटील, निर्मला इंगळे, अण्णासाहेब देवकर, आप्पासाहेब सरडे
पारेवाडी
उत्तम पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, माया झोळ , रामदास झोळ, संतोष पाटील, स्वाती पाटील, प्रविण बाबर, भाऊसाहेब देवकते, गणेश चौधरी,
वांगी –
अरुण पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनिषा दौंड, तानाजी देशमुख २, सुधीर साळुंखे, अमित केकान
भिलारवाडी –
आप्पा जाधव, सुनिता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, काशीनाथ काकडे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे, प्रविण बाबर
मांगी
दिनेश भांडवलकर , रोहीत भांडवलकर, अमोल यादव, रविंद्र लावंड, विलास शिंदे, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे २, सुभाष शिंदे, संतोष वाळुंजकर
अनुसुचित जाती –
आशिष गायकवाड, सुशमा गायकवाड, गणेश कांबळे, अर्जुन गाडे, अशोक जाधव, धनंजय काळे, समाधान कांबळे
इतर मागास
अंकुश भानवसे, अनिल अनारसे, शितल अनारसे, जया झिंजाडे २, मारुती बोबडे
महिला ऱाखीव –
सुनिता गिरंजे, पार्वती करगळ, आशाबाई भांडवलकर , माया झोळ, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ, सविता राजेभोसले, कमल पाटील, अनिता गव्हाणे, अश्विनी फाळके
भटक्या विमुक्त जाती –
कैलास कोकरे, बापु चोरमले, भगवान डोंबाळे, राजश्री चोरमले, विशाल शिंदे
इतर संस्था
नवनाथ बागल (एकमेव)