करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विविध गुंह्यातील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई ; पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांची कामगिरी 

करमाळा समाचार

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत महिला विषयी, मालाविषयी, शरीराविषयी, वाळू चोरी (वाळु माफिया), तसेच प्राण्यांची वाहतुक करून कत्तल करणारे इसमांविरूध्द असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले आठ जणावर हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इसमांची नावे पुढील प्रमाणे १) उमेश राजेंद्र गलांडे रा. चिखलठाण नं १, ता. करमाळा, २) शाहरूख आयुब कुरेशी, रा. मौलाली माळ करमाळा, ता. करमाळा, ३) समाधान उर्फ दत्तात्रय कल्याण लोहार, रा. निमगाव, ता. करमाळा, ४) संपत विठ्ठल मारकड, रा.शेलगाव वांगी, ता. करमाळा, ५) संतोष बिभिषण फरतडे, रा. सातोली, ता. करमाळा, ६) करण अंबादास खरात, रा. सिध्दार्थनगर करमाळा, ता. करमाळा, ७) आशपाक बाबासाहेब मुलाणी रा. कंदर, ता. करमाळा, ८) ओंकार दादासाहेब पुजारी, रा. देवीचा माळ करमाळा, ता. करमाळा, यांचेविरूध्द दाखल गुन्हयाचा तपास करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले तसेच त्याचे हातून भविष्यात गुन्हे घडून सार्वजनिक शांतता भंग होवून नये म्हणून वेळोवेळी प्रतिबधंक कारवाई करण्यात आली परंतु तरी सुध्दा त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही उलट ते पुन्हा पुन्हा गुन्हे करून लागले.

politics

तसेच करमाळा तालुका परिसरातील गोरगरीब जनता ही त्याचे दहशतीस घबरून पोलीस ठाणेस तकार करण्यास धजावत नाहीत. जनतेमध्ये भितीचे व दहशतीचे तसेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या जिवीतास धोका भय व इजा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. असे दिसून आल्याने लोकांना भयमुक्त करण्यासाठी व समाजाचे दैनदिन जीवन सुरळीत व शांततामय होण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ व मालमत्तेस धोका होवून नये या करीता वरील सर्व इसमांना मा. उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डुवाडी यांनी सोलापूर, पुणे, धाराशिव या जिल्यातून ६ महिने ते २ वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारित केल्याने त्याना मा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे, करमाळा पोलीस ठाणे यांनी ताबे पोलीस मार्फत सदर तडीपार इसमांना सोलापूर जिल्याचे बाहेर सोडण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे, करमाळा पोलीस ठाणे यांनी मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी सो, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक, श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील, करमाळा उपविभाग, करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यास करमाळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच करमाळा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने केली आहे.

तसेच यापुढे ही गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्यामध्ये वाळू चोरी, प्राण्यांची कत्तल करणारे, बेकायदेशीर सावकारी करणारे, तसेच महिलाची छेडछाडी करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे, व शरीराविषयी गुन्हे करणारे असे विविध प्रकारचे गुन्हे करणारे इसमांची यादी तयार करून त्याचेवर हद्दपारीची कार्यवाही प्रस्तावीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE