आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माहिती संचालक रामदासी यांना सेवेतून बडतर्फ करावे ; महा डिजिटल मिडिया असोसिएशनची मागणी
करमाळा समाचार
युट्युब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यता प्राप्त पत्रकारिता नाही असे वक्तव्य करणारे औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांना सेवेतून बडतर्फ करणे बाबत महा डिजिटल मिडिया असोसिएशन या डिजिटल मीडियातील पत्रकारांनी राज्यपालांकडे निवेदन पाठवले आहे
माहिती व जनसंपर्क संचालनाल औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी बीड येथे व्याख्यानमालेत युट्युब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यता प्राप्त पत्रकारिता नाही असे प्रकरणात कार्यवाही करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. हे मानांकित जर्नालिजम नाही असं वक्तव्य केले. तरी वरील स्टेटमेंट देत असताना गणेश रामदासी यांनी भारताचे राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केलेली अधिसूचना दिनांक 9 नोव्हेंबर 2020 चा अवमान केला असून डिजिटल मीडिया संबंधी कसलीही माहिती नसताना केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करून आपण अकार्यक्षम अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे.

त्यांचे हे वर्णन नागरी सेवा शिस्तीला अनुसरून नाही. राष्ट्रपती यांच्या आधिसुचना विरोधात बोलण्याची ही पहिलीच घटना असावी तरी रामदासी यांची चौकशी निलंबन न करता थेट बडतर्फ करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यानिवेदनावर संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण, सोहेल पठाण आनंदराव शेंडगे, स्वप्निल राऊत, समाधान वाघमारे यांच्या स्वाक्षरी आहेत.