चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप
प्रतिनिधी करमाळा
भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या सोमवार दि.३० ऑक्टोबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त करमाळा भाजपा तालुका उपाध्यक्ष आजिनाथ सुरवसे यांच्या सौजन्याने भोसे येथील जि.प. प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसे गावचे माजी सरपंच भोजराज सुरवसे,माजी मुख्याध्यापक निवृत्ती सूरवसे सर उपसरपंच हनुमंत वारे विलास रोडगे, भारत सुरवसे ,प्रकाश रोडगे, बापू बागडे,नंदलाल सुरवसे,गोविंद सुरवसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरानी श्री गणेश भाऊ चिवटे यांच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरवसे यांनी केले तर आभार काळे गुरुजी यांनी मानले.
