जिंती गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रा वाघमोडे सर व सौ सविता वाघमोडे यांच्या तर्फे दिवाळीचे फराळ वाटप
प्रतिनिधी – दिलीप दंगाणे
जिंती गावचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रा वाघमोडे सर व त्यांच्या पत्नी सौ सविता ताई वाघमोडे यांनी चार दिवसांपासून आपल्या घरी दिवाळीचे पदार्थ तयार केले व बाजारातून रिकामे बॉक्स आणून त्यामध्ये ते पॅक करून सामाजिक बांधिलकी जपत सौ सविता ताई वाघमोडे यांनी आज सकाळी ९ वाजता आपल्या जिंती येथील राहत्या घरी पाडव्याचा मुहूर्त साधून लोकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले.

यावेळी उपस्थित सुभाष वाघमोडे , हनुमंत वाघमोडे, किसन वाघमोडे , तसेच त्यांचे चिरंजीव अजित वाघमोडे इत्यादी उपस्थित होते
