जिल्हा परिषद शाळा बाळेवाडी येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
करमाळा समाचार
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुलांचे झालेले शैक्षणिक साहित्याचे नुकसान व शाळेचे शालेय साहित्याचे नुकसान पाहता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालेवाडी येथे सातारा येथील पर्यावरण अभ्यासक श्री वैभव शिवाजी जगताप सर व त्यांच्या मित्र परिवारा मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी श्री वैभव जगताप सर व त्यांचे बंधू शुभम जगताप सातारा येथून आले होते .

प्रथम शाळेतील मुलांसाठी पक्षी निरीक्षणावर एक माहितीपर सत्र आयोजित केले. यामध्ये जगताप सरांनी मुलांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या सवयी व शास्त्रीय माहिती ,पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व या बाबी समजून सांगितल्या पक्षांच्या चित्रफिती व माहिती संगणकावर बघताना मुले रमून गेली होती. यावेळी जगताप सरांंनी पर्यावरणा संदर्भात त्यांच्यामार्फत राबवले जाणारे उपक्रम मुलांना व शिक्षकांना सांगितले .
अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आल्याने मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान व शाळेतील शालेय साहित्याचे नुकसान झाल्याने त्यांच्यामार्फत शाळेला एक ग्रीन बोर्ड, ग्रंथालयासाठी पुस्तके ,मुलांना ड्रॉइंग बुक ,वह्या, कागदापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक शिसपेन्सिल, रंग कामाचे साहित्य अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच श्री जगताप सर यांनी संकलित केलेले आकाशातील विविध ढगांचे प्रकार या विषयी शास्त्रीय माहिती देणारी एक छोटीशी हस्तपुस्तिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली .

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयंत देशमुख सर, गायकवाड सर ,यादगिरे मॅडम, नगरे मॅडम तसेच ब्रह्मदेव नलावडे, संदीप नलवडे ,आनंद पाटील सर उपस्थित होते
