ताज्या घडामोडी

संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत स्कुल बॅग व वॉटर बॉटल चे वाटप

करमाळा –


मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्या वतीने अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळा केम च्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल चे वाटप आज मान्यवरांच्या हस्ते केम येथे करण्यात आले.

यावेळी पद्म पंडित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, मंडळ अधिकारी मीरा नागटिळक, अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय केम चे अध्यक्ष मारुती पारखे, विद्यमान सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत पाटील, प्रहार चे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, चेअरमन सुदर्शन तळेकर, केमचे उपसरपंच सागर कुरडे, ‌ ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, करमाळा तालुका सावता माळी परिषदेचे अध्यक्ष दुधे, गणेश तळेकर ,कांतीलाल पवार , वैजनाथ गुरव, मुख्याध्यापक नितीन जगताप, सहशिक्षक देविदास यादव यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब पवार यांनी केले तर विलासराव राऊत पाटील यांनी अध्यक्ष मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नितीन जगताप यांनी केले तर आभार काकासाहेब तळेकर यांनी मानले.

ads

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE