करमाळासोलापूर जिल्हा

ग्रामपंचायत झरे यांच्याकडून शाळा, अंगणवाड्या व आरोग्य उपकेंद्रास साहित्य वाटप

करमाळा समाचार


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी ग्रामपंचायत झरे यांचेकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सर्व शाळांना, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी ट्रॉली च्या व पेंग्विन कचराकुंड्या तसेच सर्व अंगणवाड्या व आरोग्य उपकेंद्र यांना वजन काटे वाटप करण्यात आले.

या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी सरपंच बंडू घाडगे, उपसरपंच सुनीता संजय कांबळे, माजी सरपंच सुनीता पाटील, माजी सरपंच प्रशांत पाटील, ग्रा प सदस्य भारत मोरे, मैना पोपट घाडगे, मंजुश्री मयूर मुसळे, ग्रामसेवक गणेश कळसाईत, तलाठी श्रीमती आंधळे, केंद्रीय मुख्याध्यापक , शिक्षक, ग्रामस्थ व सर्व कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE