शिवम तरूण मंडळाच्या वतीने जिल्हाअध्यक्ष अंजली श्रीवास्तव व महिलामंडळाच्या पदाधिकारींचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
शिवम तरूण मंडळाच्या वतीने मानवाधिकाररी सोलापूर जिल्हाध्यक्ष अंजली श्रीवास्तव व सर्व पदाधिकारी याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगीं बोलताना श्रीवास्तव म्हणाल्या आपले आधिकर व कर्तव्ये प्रत्येकानी महिती करून घेतली तर समाजामध्ये परिवर्तन झल्या शिवाय राहणार नाही असे मत आंतरराष्ट्रीय मनावधिकर सुरक्षा संघटनाचे नूतन जिल्हा अध्यक्ष अंजली श्रीवास्तव यांनी यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्रा नितीन देवकते , डॉ मंगेश मुरूमकर , डॉ सत्यपाल श्रीवास्तव, अजित भणगे ओम महिला मंडळाच्या दीपा मंडलेचा , पुष्पा लुंकड , मंजु राठोड , डॉ शामाप्रसाद मुखर्जी सामाजिक संस्था अध्यक्ष शाम सिंधी ,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनिल सूर्य पूजारी संजय गांधी निराधार योजना सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर उपस्थित होते.

पुढे अधिक बोलताना अंजली श्रीवास्तव म्हणाल्या आपण शिक्षित आसून अज्ञान चा बुरखा पांघरलेला आहे या मुळे समाजात भ्रष्टाचार बोकळत चाललेला आहे वंचितांना समाजाचा मुख्य प्रवाहात येणयासाठी आपले आधिकार व कर्तव्ये समजून घ्या , कुणाचे शोषण होत असले तर कायदेशीर मार्गाने न्याय मागा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही सशक्त भारताच्या निर्मितीसाठी आपणं एका विचाराने कार्य केले पाहजे आप आपसात कोणतेही मतभेद पाळू नका असे ही आवाहन त्यांनी केले.
संघटनेची जिल्हा कार्य करणी लवकरच जाहीर करण्यात येईल
या वेळी जिल्हा अध्यक्ष अंजली श्रीवास्तव , तालुकाध्यक्ष ज्योती पांढरे , कार्यकारी अध्यक्ष रेश्मा जाधव , सहसचिव मितवा श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.