शेतकऱ्यांची वीज खंडित करू नका – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा समाचार –
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विज पुरवठा खंडीत न करता विज बिल भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात यावी , अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांनी विजबिल भरणा न केल्याने विज पुरवठा खंडीत करत आहे .मागील वर्षी विज बोर्डाने दिलेल्या सवलती नुसार अनेक शेतकऱ्यांनी विज बिल भरणा केलेला आहे. तरी देखील त्या शेतकऱ्याचे चालू बिल थकीत असल्याने त्यांचा विज पुरवठा खंडीत करत आहेत.
वास्तविक पाहता चालू वर्षाचे थकीत विज बिल भरणे बाबत, रितसर प्रसिध्दी देणे आवश्यक असताना , अशी कोणतीही प्रसिध्दी न देता शेतकर्यांचे अचानक विज पुरवठा खंडीत करत आहेत. ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यांसाठी लाईट बिल भरणेबाबत रितसर प्रसिध्दी देऊन मार्च अखेर विज बिल भरणेस मुदतवाढ देण्यात यावी. तो पर्यत कोणत्याही शेतकऱ्यांची लाईट खंडीत करण्यात येवू नये अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे केली आहे .