पोकळ आश्वासन आणी खाद्यांवर बंदुका ठेऊ नका ; प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिंदे यांच्याकडुन प्रयत्न सुरु
करमाळा समाचार

रिटेवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे आमदार व माजी आमदारांचे दुर्लक्ष असल्याबाबत सोशल मिडीयात पोस्ट फिरत असताना आता आमदार कार्यालयाकडुन खुलासा करण्यात आला आहे. त्यामध्ये अडचणी आणी त्यावरील पाठपुराव्यावर बारीक लक्ष असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर विरोधकांनी कोणाच्याही खांद्यावर बंदुक न ठेवता मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो असे आव्हानच दिले आहे.

पत्रातील मजकुर पुढील प्रमाणे …
काल करमाळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. संजयमामा शिंदे दिवसभर शहरात उपस्थित असूनही ते रिटेवाडी ग्रामस्थांच्या उपोषणाकडे फिरकले नाहीत म्हणजे त्यांना या प्रश्नाचे काही घेणेदेणे नाही असा चुकीचा अर्थ काढून काही पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत..

या मंडळींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी …
रिटेवाडी या गावाची रस्त्याची मूळ समस्या काय आहे हे समजून घेण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी काल करमाळा येथील विठ्ठल निवास मध्ये पुनर्वसन अधिकारी व इतर अधिकारी यांचे समवेत बैठक घेतली , हा प्रश्न कसा सुटू शकेल यावर चर्चा केली. त्यानुसार रिटेवाडी व मांजरगाव या दोन्ही गावांच्या जमिनी शेजारी शेजारी असूनही त्यांच्या भूसंपादनाचा दर समान नाही त्यावरून काही शेतकऱ्यांनी हे काम रोखून धरले आहे हा या कामातला पहिला अडथळा आहे…
दुसरा अडथळा… कोरोना आजाराचा ..
संबंधित रिटेवाडी गावाच्या पोहोच रस्त्यासाठी शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे त्यापैकी फक्त 33 टक्के निधी उपलब्ध झालेला आहे. उर्वरित निधी कोरोणामुळे देता आलेला नाही…
त्यानुसार काल झालेल्या बैठकांच्या चर्चेचे फलित म्हणून…
मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे भूसंपादनाच्या पुनर्मूल्यांकन फेरनिवाडा करण्यासाठी बैठक घेण्यासाठी आ. संजय मामा शिंदे यांनी पत्र दिलेले आहे .तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका वरती बहिष्कार टाकणारे गाव व सध्या उपोषणाला बसलेले गाव म्हणून रिटेवाडी गावाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी निधीची तरतूद करावी यासाठी अर्थमंत्री व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे निधीची मागणी करणारे पत्रे दिली आहेत …
त्यानुसार पुढील आठवड्यात योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे…
कुठलाही प्रश्न फक्त पोकळ आश्वासने किंवा कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला म्हणून सुटत नसतो… त्यासाठी प्रश्न समजून घेऊन मुळापासून त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्या उपाययोजना आ. संजयमामा शिंदे यांनी सुरू केलेल्या आहेत.