करमाळासोलापूर जिल्हा

सालसे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा समाचार 

सिद्धार्थ तरुण मंडळ, सालसे यांच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालसे ता. करमाळा येथे कोरोना संबधित सर्व नियम पाळून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली.

सालसे गावचे सरपंच श्री.सतिश ओहोळ यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक पवार सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री.दिपक ओहोळ यांनी आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्व वर्गातील गोरगरीब जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या विषयीचे योगदान सांगितले.

आंबेडकरांनी या देशातील पाणी प्रश्न, सीमा प्रश्न व आर्थिक प्रश्न इ.सोडवण्यासाठी प्रयत्न केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय आनंदात कोव्हिड संबतीचे नियम पाळून करण्यात आली.सौ.हर्षदा दिपक ओहोळ यांनी बुद्धवंदना म्हटल्या. सिद्धार्थ तरुण मंडळ अध्यक्ष सचिन ओहोळ व इतर कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सर्व महापुरुषांचा जयजयकार करण्यात आला.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE