करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जालना जिल्ह्यातील प्रकारामुळे करमाळ्यातही निषेध ; आज तहसिल कार्यालयात निवेदन

करमाळा समाचार

शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू होते. मात्र त्याठिकाणी आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीमार केला गेला. या घटनेचा निषेध व न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज सकाळी आकरा वाजता तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे
यासाठी आकरा वाजता तहसिल परिसरात तेण्याचे अवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज पर्यत लाखोंच्या जमावासोबत ५८ मोर्चे निघाले. एकाही पोलिसाला साधी काठीही सोबत ठेवण्याची गरज पडली नाही. आज अचानक कोणाच्या सांगण्यावरून या मराठा आंदोलकांवर इतक्या अमानुषपणे लाठीमार झाला आहे. याची सर्व चौकशी व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा करमाळा व सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने केली जाणार आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE