दुख: द बातमी – देवगड दुर्घटनेत करमाळ्याच्या कन्येचा दुर्दैवी मृत्यु
करमाळा समाचार
चिंचवड येथील सैनिक अकॅडमी या प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली सहलीला गेल्यानंतर देवगड येथे चार तरुणी पाण्यात बुडाल्या आहेत. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील अनिषा नितीन पवळ (वय १९) रा. कुंभेज ता. करमाळा तिचा समावेश असल्याने कुंभेजसह तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कामानिमित्त पुणे येथे सहकुटुंब गेलेल्या नितीन पवळ यांची मुलगी सैनिक अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत होती. इतर मुलींसह ती देवगड येथे सहलीच्या निमित्ताने गेल्यानंतर तिथे सदरचा अपघात झाला व त्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाला आहे. कुंभेज येथे आजी आजोबा राहतात तर आई वडील कामानिमित्त पुणे येथेच राहत असल्याने सदरची माहिती मिळताच कुंभेज येथे आजी आजोबांवर दुख : चा डोंगर कोसळला आहे.
