करमाळासोलापूर जिल्हा

विद्यार्थ्यांची इकोफ्रेंडली गणपती मुर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

समाचार टीम

चिखलठाण ता करमाळा येथील येथील इरा पब्लिक स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांची इकोफ्रेंडली गणपती मुर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.स्कूलच्या वतीने यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यासाठी पर्यावरण जागृतीसाठी इरा च्या विद्यार्थ्यानी मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या आहेत.

पर्यावरण जागृती व प्रदूषणाच्या दुष्परिणामाची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी यासाठी चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पारंपरिक गणेश मूर्तीत प्लास्टर ऑफ पॅरिस व केमिकलचा उपयोग असतो यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक श्री आनंद कसबे सर व सर्व शिक्षिका यांच्या टीमने सर्व विद्यार्थ्या समवेत या कार्यशाळेत जलप्रदूषण व वायू प्रदूषणाला आळा बसावा म्हणून कोणत्याही केमिकलचा वापर न करता शेतातल्या काळ्याभोर मातीने या गणेश मूर्ती बनविन्यात आल्या. या वेळी सर्व विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE