राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक आव्हाड यांची निवड
करमाळा समाचार
राष्ट्रवादीचे युवा नेते अभिषेक आव्हाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निवड केली, अभिषेक आव्हाड यांची सुरवात करमाळा शहर सचिव म्हणून झाली. नंतर सलग 3 वेळेस करमाळा शहराध्यक्ष, सोलापूर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष तसेच निरीक्षक, आणि आता सोलापूर जिल्हाध्यक्ष पद हे त्यांना पक्षाने कामाची दखल घेऊन दिले आहे.

प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यावर त्याचे फळ नक्की मिळते यावर आपला विश्वास असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्व नेत्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवुन पार पाडणार असल्याचे अभिषेक आव्हाड यांनी सांगितले. अभिषेक आव्हाड यांच्या निवडीवेळी आमदार संजयमामा शिंदे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.