पोथरे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्षपदी सुनिता पठाडे यांची निवड
करमाळा समाचार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव वस्ती पोथरे तालुका करमाळा शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनिता नाना पठाडे यांची तर उपाध्यक्ष पदी विकास हरिभाऊ झिंजाडे निवड करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्याने समिती पुनर्गठित करण्यासाठी मुख्याध्यापक निशांत खारगे यांनी पालक सभा बोलावली होती. यामध्ये सुनिता पठाडे अध्यक्ष व विकास झिंजाडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

सचिवपदी मुख्याध्यापक निशांत खारगे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून कल्याणी रामदासी तर सदस्य म्हणून रामा सदाशिव काळे, काजल जितेंद्र शिंदे, आजिनाथ रंगनाथ झिंजाडे, मनीषा शहाजी झिंजाडे, स्वाती नवनाथ नाळे, संदीप ईश्वर झिंजाडे, सुवर्णा सोमनाथ नाळे, प्रतिक्षा शशिकांत झिंजाडे स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी राणी दत्तात्रय काळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा मुख्याध्यापक निशांत खारगे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.