कंदर ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार ! ; कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस पवार यांची चौकशीची मागणी
करमाळा समाचार
मौजे कंदर तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करणेबाबत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस अण्णासाहेब पंडीतराव पवार यांनी मागणी केली आहे. सदरच्या ग्रामपंचायतीवर सध्या आमदार संजयमामा शिंदे गटाचे वर्चस्व आहे. तर अण्णासाहेब पवार हे माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे कट्टर समर्थक आहेत. सध्या सुरू असलेल्या वादामुळे कंदर ग्रामपंचायत ही चर्चेचा विषय ठरत आहे.

याप्रकरणी दिलेल्या अर्जात पवार यांनी विविध विषयांबाबत तब्बल चार हजार पाणी तक्रार विभागीय आयुक्त पुणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल केली आहे. या तक्रारी मध्ये कंदर ग्रामपंचायतीमध्ये 2018 ते अखेरपर्यंत एक कोटी 57 लाख 1188 रुपयांचा एकूण निधी उपलब्ध झाला आहे. सदरच्या निधी खर्च करताना शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबाबत पवार यांनी तक्रार केली आहे.

सदर विविध योजनेतून खर्च केलेल्या कामात लाखो रुपयांचा अपहार दिसून येत आहे. तरी कृपया वरील गावच्या कारभाराची केलेल्या अनियमितेबाबत कसून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. एकूण आलेला निधी मध्ये 14 वा वित्त आयोग, नागरी सुविधा, जनसुविधा, दलित वस्ती अशा विविध योजनांमध्ये एकूण आलेला आहे.