वाशिंबेतील युवकाच्या प्रयत्नामुळे पंधरा जणांचे प्राण ; मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली दखल
केतूर –
कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर धुवाधार पाऊस होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड चिपळूण महाड आदी भागातील नदी आनाडी धबधबे पुराच्या पाण्याने ओसंडून वाहत आहे काही गावात पाणी शिरल्याने गावाचा जगाशी संपर्क तुटला आहे.रस्ते, पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत तर बहुतांश गावांमध्ये पाणी भरले आहे.पाण्याने गावेच्या गावे विळख्यात घेतली आहेत अशा परिस्थितीत नागरिक घरातच अडकून पडले आहेत या पार्श्वभूमीवर शासनाकडून अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.अशा या परिस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून केलेल्या ट्विटमुळे व या ट्वीटची कार्यालयाने तत्परतेने दखल घेतल्याने 15 जणांचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की,वाशिंबे (ता,करमाळा) येथील युवक अतुल राजाभाऊ पाटील हा वर्षभरापूर्वी चिपळूण येथे बीएससी एग्री शिक्षण घेत होता.तू भाड्याने राहत असलेल्या ठिकाणचे लोक पाण्याने वेढा दिल्याने अडकून पडले होते त्यांनी मदतीसाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाटील यांनी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला केलेल्या एका व्टिटमुळे पंधरा नागरीक व एका गरोदर महीलेचे प्राण वाचले आहेत. चिपळूण येथील कळंबस्ते भाग शाळेजवळ वशिष्ठी नदीला पूर आल्याने तेथील नागरीकांनी घराच्या छताचा आसरा घेतला होता,परंतु पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.

त्यामूळे संपूर्ण घर पाण्याखाली जाण्याची शक्यता होती.पिडीत नागरीकांनी मोबाईल व्दारे संपर्क करून मदतीसाठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना आवाहन केले.यामध्ये अतुल पाटील यांच्याशी संपर्क होताच पाटील यांनी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला ट्रवीट करत संबंधित ठिकाण व पिडीतांचा मोबाईल क्रमांक पाठवत मित्रांसाठी मदतीची विनंती केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी पिडीतांशी संपर्क साधून तात्काळ एनडीआरएफच्या तुकड्या पाचारण करून पिडीतांना सुखरुप बाहेर काढले. अतुलच्या कार्यतत्परतेचे कौतुक संपूर्ण समाज माध्यमातून होत आहे.
“चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या जवळच्या संबंध असणाऱ्यांनी संपर्क साधला मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत ट्विट केले असता शासकीय यंत्रणा याबाबत किती सतर्क आहे याची प्रचिती आली ट्विट केल्यानंतर अर्ध्यातासातच ची दखल घेतली गेली याचे मनोमन समाधान वाटत आहे.”
अतुल पाटील, वाशिंबे (ता. करमाळा)