अखेर प्रशासकीय इमारतीचे टेंडर निघाले ; ११ ऑक्टोबर पर्यत मुदत
करमाळा –
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आलेलं नवं प्रशासकीय भवन बांधण्यासाठी नुकतंच टेंडर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. यानुसार 11 ऑक्टोंबर पर्यत भरता येणार तर 14 ऑक्टोंबर दरम्यान सदर टेंडर उघडले जाणार आहे. इमारतीवरुन मागे बराच गोंधळ झाला तरीही त्याच ठिकाणी कार्यालय होण्याचं जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. यावर आता यासंदर्भात विरोध करणारे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी करमाळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासंदर्भात जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मौलाली माळ येथे सदरचे बांधकाम केले जाणार असून या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले होते.

त्यानंतर लोकांमधून समाज माध्यमातून विरोध दिसून आला. परंतु सर्वपक्षीय आंदोलने करण्याचा इशारा देणाऱ्या लोकांनी पुढे काय भूमिका मांडली नाही. शिवाय दुसऱ्या जागी बाबत चाचणी चालू असल्याचेही संबंधित विभाग व आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण सध्या तरी त्याच ठिकाणी सदरची इमारत उभे राहण्याची दिसून येत आहे. यामुळे विरोधात आंदोलन करणारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष राहिल.