सेट परीक्षेत करमाळा येथील विद्यार्थिनी फिजा शेख यांचे घवघवी यश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्स ची विद्यार्थिनी फिजा जमीर शेख या विद्यार्थिनीने सेट परीक्षेत करमाळा तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. फिजा शेख हिला ९९. ४३ पर्सटाईल गुण मिळवले आहे. इयत्ता बारावीच्या सायन्स मध्ये देखील तिला ८६ टक्के गुण मिळाले आहे.

फिजा शेख करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक येथील हिंदुस्तान फुटवेअर चे व्यवस्थापक जमीर शेख यांची ज्येष्ठ कन्या आहे. तिने सदरचे यश प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे विशेषतः मुस्लिम समाजाच्या वतीने अभिनंदन होत आहे. तिला मनोज थोरात, महेश पाटोळे तसेच तळेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन तसेच रहेनोमा चॅरिटेबल ट्रस्ट याशिवाय बहुजन विकास संस्था व करमाळा मुस्लिम जमात यांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य कापले सर हाजी आसिफ शेख, समीर शेख, इकबाल खान सर, इसाक पठाण, असलम शेख वस्ताद तसेच राजू बागवान यांनी तिच्या यशाबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
करमाळा तालुक्यामधून विशेषता अल्पसंख्यांक वर्गातून तिने हे यश मिळवले आहे आपण भविष्यात वैद्यकीय क्षेत्रातील बी फार्मसी पदवी धारण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.