भाजपा व्यापार आघाडी वतीने निराधार व्यक्तींना अन्नदान व चारा वाटप कार्यक्रम संपन्न
करमाळा समाचार
राज्याचे लोकप्रिय नेते व उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व्यापार आघाडी च्या वतीने आज शहरातील निराधार व्यक्तींना अन्नदान आणि पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे चारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शहरातील पांजरपोळ गोरक्षण संस्था येथील जनावरांसाठी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले तसेच शहराध्यक्ष जगदीश आगरवाल आणि बाळासाहेब कुंभार यांच्या हस्ते निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.
यावेळी तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सरचिटणीस शाम सिंधी, जिल्हा किसान मोर्चा चे लक्ष्मण केकान,तालुका किसान मोर्चा चे विजय नागवडे, माजी तालुका अध्यक्ष संजय घोरपडे, संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर, सहकार आघाडीचे सचिन चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्षा संगीता नष्टे, शहर वाहतूक चे सचिन पांढरे, ओबीसी मोर्चाचे प्रकाश ननवरे, संजय जमदाडे, गणेश वाशिंबेकर, मनोज कुलकर्णी, पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष भरत गांधी, जकिर भाई, महादेव गोसावी, अजित जागते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी मानले.