माजी आमदारांचे चिरंजीव केत्तुर गणातून अपक्ष निवडणूक लढवणार
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण जाहीर झाले असून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतुर हा गण सर्वसाधारण जागेसाठी आहे. या गणातूनच करमाळा तालुक्याचे माजी आमदार कै. रावसाहेब पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उर्फ धनीसाहेबअपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

श्री उदयसिंह मोरे पाटील यांनी यापूर्वी केतुर गावचे सरपंच म्हणून काम केले असून कै. रावसाहेब पाटील यांच्यापासून त्यांना मानणारा मोठा वर्ग या पश्चिम भागात आहे. या दृष्टीनेच त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. ते मोहिते पाटील गटाचे समर्थक असले तरी
त्यांनी अपक्ष लढवण्याची तयारी केली असून कोणत्याच गटाची किंवा पक्षाची उमेदवारी घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.