नोकरीला लावण्याचे अमिष दाखऊन पुण्याच्या महिलेकडुन किल्ला विभागातील एकाची फसवणुक
करमाळा – प्रतिनिधी
नोकरीला लावण्याचे अमिष दाखऊन एकाची चार लाख वीस हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आंबेगाव जिल्हा पुणे येथील एका महिलेवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार जुलै २०२० पासुन सुरु होता अखेर शुक्रवारी त्या महिलेवर गुन्हा दाक्जल झाला आहे.

सोनम राजन पाटील रा.प्लॉट नंबर ५१०, व्यंकटेश्वरा टावर, इच्छापुर्ती गणेश मंदीराचे जवळ, दत्तनगर रोड, आंबेगाव बु।। भारती विदयापीठ पुणे असे संबधीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनिरूध्द बाळासाहेब शेलार वय ३० रा.किल्ला विभाग यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, संशयीत आरोपी महिलेने तक्रारदार शेलार यास आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणुन नोकरीस लावते असे सांगुन विश्वासात घेवुन वेऴोवेऴी गुगल पे व आर.टी.जी.एस द्वारे ४ लाख ९० हजार रूपये घेवून त्यापैकी ७० हजार परत दिलेले आहेत. त्यामुळे चार लाख २० हजार ५०० रूपयाची फसवणुक केली.
तरीसुद्धा जाँईनिंग लेटर न दिल्याने संशयीत सोनम पाटील यांना विचारापुस केली असता त्यांनी टाऴाटाऴ केली. त्यानंतर अक्षयकुमार शेलार यानी उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय करमाऴा येथे तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर तपास करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एन जगदाळे करीत आहेत.