उस वाहतुकदाराची मजुर ठेकेदाराकडुन बारा लाखांची फसवणुक ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
विठ्ठल रिफाईंड साखर कारखान्याला ऊस वाहतुकीचा करार केल्यानंतर मजूर शोधण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराला भलतेच महागात पडले आहे. धुळे जिल्ह्यातील एकाने बारा लाख रुपये घेऊन मजूरही पुरवला नाही व पैसेही माघारी देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यापूर्वीही बऱ्याच वेळा असे प्रकार घडले असून शासनाने संबंधित लोकांवर कडक शासन व्हावे म्हणून जाहीर केले होते. त्याप्रमाणे आता ऊस मजूर पुरवठा करण्याचे सांगून मजुरांचा पुरवठा न केल्यास संबंधितांवर कारवाई होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल करमाळ्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील खैखुटी ता. शिरपूर येथील बारका बजाऱ्या पावरा या ठेकेदारास बारा लाख रुपये दिले. तरी मजुरही पुरवला नाही व पैसेही दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी पावरा या ठेकेदारावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची तक्रार महादेव दगडू वीर (वय ३९) रा शेलगाव यांनी दि १७ रोजी दिली आहे.