करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विक्रमसिंह शिंदेंसह इतरांचीही फसवणुक तिसऱ्यांदा गुन्हा दाखल

करमाळा समाचार

कारखान्याचे प्रमुख विक्रम शिंदे व कारखान्याची फसवणूक करणाऱ्या लोकांवर तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीचा गुन्हा कारखान्याची फसवणूक दुसरा काही कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या शेअर मार्केट मध्ये फसवणूक झाल्याची तक्रार झाली होती. तर आता जामीन मिळाल्यानंतर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पाच लोकांकडून दीड लाख प्रत्येकी घेतले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

सुरुवातीला कारखान्याची प्रमुख विक्रमसिंह शिंदे यांना साखर निर्यात करण्यासाठी परवानगी देतो म्हणून 25 लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पकडल्यानंतर करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या काही सहकाऱ्यांचेही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु सदरचे लोक फसवे असल्यानंतर त्यांनीही करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

नुकताच त्या संशयीत आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या पोहोच पावत्या खोट्या असल्याचे निदर्शनास आल्या. त्यामुळे वी आर मूर्ती, (नवी दिल्ली), श्रीनिवास राव (सिकंदराबाद), बलविंदर सिंग (नोएडा), पायल मॅडम अशा लोकांवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल पवार देवीचामाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE