E-Paperकरमाळाकृषीताज्या घडामोडीमहिलांविषयकसकारात्मकसामाजिकसाहित्यसोलापूर जिल्हासोलापूर शहर

नातसुनेच्या कल्पनेतुन काशी आज्जी पोहचली देशविदेशात ; आज्जीच्या रेसीपीला मिळतेय पसंती

विशाल घोलप | करमाळा

गावाकडच राहणीमान, साधेपणा, माया, ममता, भोळेपणा आपल्यासोबत घेऊन लोकांना आकर्षीत करीत गावाकडच्या वृद्ध जोडप्याने महाराष्ट्रातील अनेकांना भुरळ पाडलीय. साध्यापद्धतीने चुलीवर केलेला स्वयंपाक लोकांना भावला असुन काशीआजीची रेसिपी देशभरासह विदेशातही पोहचली आहे. करमाळ्याच्या ग्रामीण भागातील या जोडप्याने समाजमाध्यमात सपशेल धुमाकुळ घातल्याचे दिसुन येत आहे. काशीबाई व चांगदेव भोगल रा. बोरगाव ता. करमाळा असे त्या आज्जी आजोबाचे नाव आहे.

politics

तालुक्यातील बोरगाव येथे सामान्य कुटुंबातील आजीबाई काशीबाईने संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबातील लोकांची मर्जी राखण्यात आयुष्य घालवलं. घरातील व शेतातील काम सांभाळत तिने संपूर्ण संसार उभा केला. त्या आजीसारख्याच इतर महिलाही संपूर्ण आयुष्य आपल्या ग्रामीण भागात जगत आहेत. बरेचसे लोक शहराकडे कामधंदा निमित्त वळाले. पण ग्रामीण भागातलं सोनं अजूनही तसंच आहे हे काशीबाईने दाखवून दिले आहे. जुन्या रुढी, परंपरा व ग्रामीण सौंदर्य जे कधीच संपणार नाही ते आजही काशीबाई सारख्या लोकांमुळे ग्रामीण सौदर्य जिवंत आहे याचे उदाहरण दिसून येत आहे.

धकाधकीच्या आयुष्यात लोक कामधंद्याच्या निमित्ताने शहराकडे गेले. पण त्याची ओढ आजही गावाकडे कायम आहे. ते आज्जीचे गावाकडचे व्हिडिओ पाहून सुखावत आहेत. त्यांच्याकडून बराचसा प्रतिसाद मिळत आहे. आज्जीने बनवलेला स्वयंपाक आपापल्या घरी तयार करून किंवा चुलीवर तयार होते ते पाहून सुखी होताना दिसत आहेत. त्यांना भेटण्याची बऱ्याचशा लोकांची इच्छा असल्याने बाहेरूनही लोक त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. गावाकडे येऊन भेट देऊन जात आहेत अशा या आजीने समाज माध्यमात धुमाकूळ घातला असून त्यांच्या व्हिडिओंना पसंती देणारे लाखोंच्या घरात आहेत. युट्युब व इंस्टाग्राम मधून सध्या त्या चर्चेला जात आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांना पैशांची आवकही सुरू झाली आहे. त्यामुळे आपली संस्कृती जपत, छंद जपत एक वेगळे उत्पन्न हे सुरू झाले आहे.

काशीबाई यांचा नातू नाना व सुन सारीका यांनी काशीआज्जीची रेसीपी नावाने २०२१ मध्ये आजीच्या हाताची चुलीवरील खमंग अशी गावरान चव मिळणारी रेसिपी जगासमोर आणली. वयाच्या ७१ व्या वर्षी देखील आजीची जिद्द पाहून लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोक आजी सोबत गावाकडे राहण्यासाठी उत्सुक असतात. व्हिडिओमध्ये शेताकडची हिऱवळ, मातीच्या दरवळा, रानभाज्या पक्ष्यांचा किलबिलाट व आजीच्या बोलण्यातून प्रेम माया जाणवते. अशावेळी पारंपारिक जुने पदार्थ शिकण्यास, गावाकडची परंपरा, रानभाज्या व त्याचे महत्त्व, गावाकडील सण उत्सव व गावाकडचं बोलणं, त्यासोबतच आजी आजोबांची माया व प्रेम या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असल्याने एक प्रकारचे लोक आजी व आजोबाचे चाहते बनले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE