जबरी दरोडा मधील फरारी आरोपी अटकेत ; करमाळा पोलिसांची कारवाई
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी मांगी गाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, गणेश खोटे यांचे पथक मांगी गावात रवाना केले.

वरील पथकाने मांगी गावच्या शिवारात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा, जबरी चोरी मधील फरारी आरोपी महेश उर्फ मावड्या मंगेश काळे राहणार कुळधरण तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर अटक केली.

सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 816/2020 भादवि कलम 395,394,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा ,कर्जत, रांजणगाव ,श्रीगोंदा आज पर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 13 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माहुरकर हे करत आहेत.