शेतकऱ्यांची गांधीगिरी ; पुष्पगुच्छ देऊन केले आंदोलन
करमाळा समाचार -संजय साखरे
महा वितरण कंपनीने कोणतीही पुर्व सूचना न देता कृषी पंपाची विज खंडीत केल्याने केत्तूर येथील शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने विद्युत वितरण कंपनीचे पारेवाडी सब स्टेशन चे कनिष्ठ अभियंता श्री निकम साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन केले.

नियमीत पणे विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडित केल्याने अतोनात नुकसान होत असून याला सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार आहे असे लेखी निवेदन देण्यात आले. सध्या ऊस तोडणी हंगाम चालू असून शेतकऱ्यांची उसाची बिले येणे बाकी आहेत .
याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या ऊस तुटून गेलेला आहे त्या शेतकऱ्यांना खोडवा ऊसाला पाणी देण्याची अत्यंत गरज आहे. तर काही शेतकऱ्यांच्या ऊस लागवडी सुरू आहेत . यामुळे सर्वांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाला असून त्यांनी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन केले.

यावेळी विजय येडे, संजय फडतरे,लक्ष्मीकांत पाटील,आबासाहेब येडे,दादासाहेब कोकणे, बापू राऊत, संदीप राऊत,श्रीकांत जरांडे, अनिकेत मिंड, अक्षय कोकणे,संतोष शेंडगे आदी शेतकरी उपस्थित होते.