जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन उतुंग यशाला गवसणी ; गावातील चौथा पोलिस उपनिरिक्षक होण्याचा मान
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जयवंत पवार यांच्या चिरंजीवाने सर्व चे नाव उज्वल केले आहे. लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षेमध्ये निर्णय होऊन उपनिरीक्षक पदी गवसणी घेतली आहे.. उपनिरीक्षक पदी जाणारा सागर हा सरपडोह गावातील चौथा युवक असल्याने गावातही जल्लोषाचे वातावरण आहे

सागर जयवंत पवार वय २७ सरपडोह याचे प्राथमिक शिक्षण उरळी कांचन येथे जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. दहावीपर्यंत उरळीकांचनेते शिक्षण पूर्ण केल्यानंतर सागर यांनी पुणे सिंहगड कॉलेजला बी ई मेकॅनिकल शिक्षण पूर्ण केले. तर नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला.

एक वर्ष युनिक अकॅडमी येथे मार्गदर्शन घेतल्यानंतर सागर वैयक्तिक अभ्यासाकडे लक्ष देत असे. यामध्ये त्याचे आई वडील व मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य लाभला आहे. तर गावातील इतर तिघांना त्याने आदर्श मानून आपला अभ्यास केल्याचे तो सांगतो.
सागरच्या पूर्वी सरपडोह गावातील
प्रदिप भिताडे (मुंबई) , संदिप भिताडे (ट्रेनिंग नाशीक) , रविद्र ढावरे (पुणे), यांनी लोकसेवा आयोगाची परिक्षा पास केली आहे. ते सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच्या आई वडीलांसह गावकऱ्यांनी व मनोहर रणदिवे यांनी अभिनंदन केले आहे.