पतीच्या निधनानंतर महिलेचा सासरच्या मंडळींकडुन छळ ; सासु सह पाच जणांवर गुन्हा
करमाळा समाचार
पतीच्या निधनानंतर विभक्त राहत असलेल्या सासु, दिर व कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सोगाव पूर्व येथील सासूसह पाच जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार श्रीमती स्मिता सरडे वय ३७ यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी सासू कस्तुराबाई सरडे, दीर नेमिनाथ सरडे, जाऊ विद्या सरडे रा. सोगाव पुर्व , ननंद धनश्री खाडे व गणेश खाडे रा. औरंगाबाद यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , स्मिता सरडे यांचे पती लीलाधर सरडे यांचं डिसेंबर 2021 मध्ये निधन झाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये स्मिता या कुटुंबापासून विभक्त राहू लागल्या व आपल्या पतीच्या नावावर असलेल्या 17 एकर शेतीवर उपजीविका भागवत आहेत. पण सासू, दिर व इतर मंडळी वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देऊ लागली. मारहाण करून ‘मुलांना घेऊन इथून निघून जा’ असे धमकी देऊ लागले.
त्यानंतर तुला इथे राहायचे असेल तर तुझ्या जमिनीत निघालेले उत्पन्न आम्हाला दे असे म्हणु लागले. त्यास नकार दिल्यानंतर सर्वांनी मिळून शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार स्मिता यांनी दिली आहे.