करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मा.आ.संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

करमाळा


करमाळा तालुक्याचे विकासप्रीय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस आज करमाळा शहर व ग्रामीण भागात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्य पर श्री देवीचा माळ येथील श्री कमला भवानी चरणी प्रार्थना व आरती करण्यात आली.नंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे हस्ते देवीचा माळ येथील जगदंबा मूकबधिर निवासी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सुजित बागल , एड.अजित विघ्ने, एड.नितीन राजेभोसले,भरत अवताडे यांनी मनोगते व्यक्त केली.तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जे उपक्रम आयोजित केले आहेत त्याचे कौतुक केले.
सकाळी 11 वाजता दुचाकी व चारचाकी वाहनांना मोफत पियुसी कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन बायपास रोड येथील विठ्ठल निवास येथे करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी उपस्थिती लावली व मार्गदर्शन केले.सकाळी 11.30 वाजता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे आणि गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांच्या हस्ते शहरातील पांजरा पोळ गोशाळेत चारा वाटप करण्यात आले.

दुपारी 12 वाजता किल्लावेस ते सदरा (फुलसौंदर) चौक दरम्यान वेताळ पेठेतील दोन्ही बाजूंची काँक्रीट गटारे बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. करमाळा नगरपालिकेचे नगररचनाकार शशांक भोसले यांचे हस्ते व सार्वजनिक बांधकाम उपविभागचे स्थापत्य अभियंता संदीप नवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

ads

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आले.यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीनराजे भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. शिवराज जगताप, अशपाक जमादार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, तालुकाध्यक्ष किरण फुंदे, तालुका कार्याध्यक्ष सुजित बागल, तुषार शिंदे, सूरज ढेरे, सचिन वैकर, उदय येवले, राहुल वनारसे, प्रफुल्ल शिंदे, सागर गायकवाड, उद्धव वीर, राष्ट्रवादी महिलाच्या नंदिनी लुंगारे, तालुका उपाध्यक्ष सौ. शिंदे, प्रकाश माने आदी यावेळी उपस्थित होते..

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE