प्रा.करे-पाटील यांना मानाचा श्री.कमलाई देवी गौरव पुरस्कार प्रदान
करमाळा समाचार
प्रा.करे-पाटील यांना मानाचा श्री.कमलाई देवी गौरव पुरस्कार प्रदान
श्री जगदंबा देवी बहुउद्देशीय संस्था आणि अन्नछत्र मंडळ देवीचा माळ करमाळा यांच्या वतीने राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा प्राध्यापक श्री गणेश करे पाटील यांना समारंभ पूर्वक देण्यात आला. देवीचा माळ येथे राजेराव रंभा तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कमलाई फेस्टिवल 2023 या समारंभाच्या वेळी तसेच बक्षीस वितरणाच्या समयी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळेस बोलताना श्री करे-पाटील म्हणाले की
आतापर्यंत गेल्या दहा वर्षांत अनेक पुरस्कार मिळाले पण आई कमलाभवानीच्या दरबारात मिळणारा हा पुरस्कार म्हणजे,घरातल्या व्यक्तिने घेतलेली सेवेची हि विशेष दखल आहे,हा पुरस्कार मला विद्यार्थ्यांमुळे मिळतोय याचा मला आनंद व अभिमान वाटतोय,या पुरस्काराने भविष्यात अधिकाधिक उत्साहाने काम करण्यास प्रेरणा मिळेल.

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, बालरोग तज्ञ डॉक्टर कविता कांबळे मॅडम, संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे, सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दीपक थोरबोले, प्राचार्य बाळासाहेब नरारे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी श्री. श्रीकांत चव्हाण (म.न.वि.से. ता. अध्यक्ष करमाळा) श्री.सचिन चोरमुले (तंटामुक्त अध्यक्ष श्रीदेवीचामाळ) श्री. श्रेणिकशेठ खाटेर (सामाजिक कार्यकर्ते) श्री. प्रशांतशेठ ढाळे (मा. नगराध्यक्ष)
हन पवार, नवनाथ (भैय्या) सोरटे,प्रतिक चव्हाण (आईसाहेब ॲटोमोबाईल्स & गॅरेज) केतन काश्विद (शिवांश हेअर स्टाईल) श्री.संतोष वारे (ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) श्री. अमोलशेठ चव्हाण (सदस्य ग्रा.पं.) श्री. अक्षय बेंद्रे (कमलाई फॅब्रिकेशन) श्री. संतोष पवार (सदस्य ग्रा.पं.) आदि मान्यवर उपस्थित होते.