दिव्यदर्शन फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांना भेट देऊन सन्मान
करमाळा समाचार
कोरोना काळात करमाळा शहरामध्ये प्रशासनाने व शासकीय रुग्णालयाने कोरोनाकाळात उत्तम कामगिरी बजावली.
प्रशासकिय अधिकारी यांनी प्रसंगी आपले प्राण संकटामधे टाकून शहरवासियांची घेतलेली दक्षता व दिलेल्या सेवेबद्दल आज दिव्यदर्शन फॉउण्डेशनचे अध्यक्ष श्री आकाश जितेंद्र लुणिया यांच्याकडून करमाळा नगर परिषद, करमाला उपजिल्हा रुग्णालय व पोलिस स्टेशन करमाळा मधील सर्व सहकारी बंधुभगीनींना प्रत्येकी ५०० रु प्रमाणे ३०० गिफ्ट कूपनची आपुलकिची भेट देण्यात आली.

यानिमिताने सर्व बंधु भागिनिंना ५०० रु पर्यंत मोफत खरेदी करता येणार आहे. यावेळी करमाळा नगर परिषदे चे मुख्याधिकारी सौ वीणा पवार , पोलिस उपनिरीक्षक श्री सुर्यकांत कोकणे साहेब, उपजिल्हा रुग्नालयाचे डॉ डुकरे साहेब, तसेच नगरसेवक श्री संजय सावंत, श्री प्रविन जाधव, व्यापारी अमित सोलंकी, आदेश लुनिया, प्रदीप बलदोटा, भूषण खुले, जगदीश शिगचि, उपस्थित होते.
