राजकीय वादातुन दोन गटात मारहाण; माजी आमदार सुपुत्रासह ११ जणांवर गुन्हे दाखल
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात राजकीय वादातून दोन गटात मारामारी झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्या मुलासह 11 जणांचा समावेश आहे. यावेळी पाटील गटाच्या पाच तर शिंदे समर्थक गटाच्या सहा लोकांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.


सदरचा वाद हा कोंढेज येथील तलावात पाणी आल्यानंतर पुजनावरुन झाला आहे. दि 08/10/2021 रोजी सकाळी 09/30 वाचे सुमारास मौजे कोंडेज या गावात तुळजाभवाणी मंदिराजवळ तलावापाशी मौजे कोंडेज ता. करमाळा याठिकाणी हा वाद घडला आहे. यामध्ये लाकडी काठी , लोखंडी गज , तलवार आदिंचा समावेश असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोर जेरबंद ; रात्री तीन वाजता आले होते चोर
पहिल्या फिर्यादी -रेवनाथ छगन लोंढे वय 35 वर्षे धंदा शेती रा. कोंढेज यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये 1) आनिल पांडुरंग फाटके 2) रहिम मियॉ शेख, 3)राजेद्र वंसत चादंन 4) महादेव रामदास आरणे 5) दशरथ पोपट लोंढे 6) पांडुरंग विष्णु फाटकेसर्व रा. कोंडेज ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या फिर्यादी – पांडुरंग फाटके यांनी दिली आहे. यांध्ये १) पृथ्वीराज भैया पाटील, २)निखील मारकड, ३) आबा मारकड, रामा गलांडे व सुनिल तळेकर यांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर घटना घडल्यानंतर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलिसांनी संपूर्ण बंदोबस्त कडक ठेवत वाद वाढू नये याची काळजी घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व दुसऱ्या फिर्यादीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ हे करीत आहे.