दंडात्मक नियमांचा व्यवसायावर परिणाम ; दंडापेक्षा जनजागृती करावी
करमाळा समाचार
लॉक डाऊन नंतर आता कुठे लहान मोठे व्यापार्यांचे व्यवसाय पूर्व पदावर येत असताना कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे हळू हळू रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठेत प्रशासनाने आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात,अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी तो संपलेला नाही.सध्या सुगीची कामे,वाढता उन्हाळा बघता खेड्या पाड्यातील नागरिकांची शहरात वर्दळ कमी आहे यामुळे बाजारपेठेत व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.त्यातच व्यापार पेठेत येणाऱ्या वाहनांना आणि नागरीकाना प्रशासनामार्फत होत असलेल्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागतं असल्यामुळे पेठेतील गर्दी कमी होत आहे.तरी प्रशासनाला विनंती आहे की दंडात्मक कारवाई न करता जास्तीत जास्त जनजागृती करावी.

भाजी विक्रेते, फेरीवाले यांना नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर आणि व्यापार पेठेमध्ये नियमित औषध फवारणी करावी तसेच स्वच्छते साठी घंटा गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात.मास्क नाही खरेदी-विक्री नाही याबाबत जनजागृती करून नियमांची कडक अमलबजावणी करावी.या संदर्भात मुख्याधिकारी यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.व्यवसायिकांनी देखील सर्व प्रकारचे नियम पाळावे प्रशासनाला दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडू नये असे आवाहन देखील श्री कटारिया यांनी केले आहे. यावेळी नरेंद्र ठाकूर, शाम जी सिंधी, सचिन चव्हाण, कांबळे सर आदी उपस्थित होते.