पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; जिंतीकडे जाणारा मार्ग वळवला – अडचणीत वाढ
जिंती – प्रतिनिधी
करमाळा ते पुणे जाणाऱ्या प्रवाशांना आता एक नव्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जिंती येथील बोगद्याचे काम सुरू असल्याने तसेच रेल्वे गेट बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मकाई कारखान्यात पासून भगतवाडीच्या दिशेने जावे लागत आहे. त्याशिवाय रस्ता खराब असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही अडचण राहणार आहे. पण रेल्वेने गेट का बंद ठेवले हा मोठा प्रश्न आहे.

BREAKING NEWS –

*नोकरीला लावण्याचे अमिष दाखऊन पुण्याच्या महिलेकडुन किल्ला विभागातील एकाची फसवणुक*
https://karmalasamachar.com/fraud-of-one-of-the-fort-department-by-a-pune-woman-pretending-to-be-employed/
कोर्टी ते जिंती मार्गे डिकसळ पुलापर्यंत अतिशय चांगला रस्ता असल्याने बरीच वाहतूक आता राशीन मार्गे जाण्याऐवजी जिंती मार्गे पुण्याकडे जाते. आता बोगद्याचे काम सुरू असल्याने कमीत कमी दहा दिवस हे काम पूर्ण होण्यासाठी लागतील तोपर्यंत बोगद्यातील वाहतूक बंदच राहणार आहे. शिवाय रेल्वेने काही कारणास्तव बोगद्यावरील रेल्वे गेट हे बंद ठेवल्याने तेही जवळपास दहा ते बारा दिवस खुले केले जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आलेला आहे.
वळवलेला मार्ग हा भगतवाडीहुन पुन्हा जिंतीकडे निघतो. तिथून पुन्हा डिकसळ पुलाकडे जावे लागते. असा हा मार्ग असला तरी मकाई कारखाना ते भगतवाडी हा मार्ग वाहतुकीसाठी थोडासा खराब असल्याने रात्री अपरात्रीचा प्रवास त्या दिशेने टाळलेला बरा अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक जिंती मार्गे करावी का राशीन मार्गे करावी हा मुख्य प्रश्न चालकांना पडलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत बोगद्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत वरील गेट ओपन करावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.