राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखेचा राजुरीत शुभारंभ
करमाळा समाचार
राजुरी तालुका करमाळा येथे आज सकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शाखेचा शुभारंभ पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई गुंड पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील महिला वर्गात व तळागाळातील उपेक्षित जनतेपर्यंत पोहोचवणे हेच पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे .याच माध्यमातून महिलांचे सबलीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व प्रचार करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

यावेळी करमाळा तालुका विधानसभा महिला अध्यक्ष सौ वर्षा ताई साखरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री गौरव झांजुरणे उपस्थित होते. यावेळी या शाखेच्या अध्यक्षपदी सौ अर्चना गणेश जाधव तर उपाध्यक्षपदी मोहिनी अमोल दुरंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सौ कोमल साखरे, वैशाली जगताप , मोहिनी साखरे , मंगल सराटे ,सुरेखा सारंगकर ,महानंदा टापरे यांच्यासह राजुरी चे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे ,आर. आर. बापू साखरे, नंदकुमार जगताप, दिलीप सारंगकर, मनोज शिंदे ,उदय साखरे, गणेश जाधव, मारुती साखरे सर, ज्ञानदेव दुरंदे,आजिनाथ दुरंदे,श्रीकांत साखरे ,अमोल दुरंदे ,दीपक साखरे, महादेव दुरंदे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.