प्रलंबित असलेल्या राजुरी ते वाशिंबे रेल्वे लाईन या 5.4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन
करमाळा समाचार -संजय साखरे
गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या राजुरी ते वाशिंबे रेल्वे लाईन या 5.4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक तानाजी बापू झोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सदर रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून याची लांबी 5.4 किलोमीटर इतकी आहे. आमदार संजय मामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला आहे. सदर रस्ता ऊस वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तो अत्यंत सोयीचा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची लोकांची मागणी होती. या रस्त्यासाठी तीन कोटी 46 लाख इतका निधी मंजूर झाला असून यामध्ये चार सी .डी वर्क चा समावेश आहे.
यावेळी अमोल पवार (वाशिंबे),राजुरी चे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, आर. आर. बापू साखरे, नंदकुमार जगताप ,गणेश जाधव ,नवनाथ शिंदे, आत्माराम दुरंदे, नवनाथ दुरंदे, कल्याण दुरंदे, मल्हारी दुरंदे, गणेश देशमुख, प्रवीण साखरे, उदय साखरे ,रवींद्र गरुड, दादासाहेब सारंगकर, संकेत अवघडे, पापा भाई शेख, शांतीलाल दुरंदे ,राहुल पाटील ,प्रकाश शिंदे ,निलचंद दुरंदे व हनुमंत दुरंदे आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी होती. अनेक पुढाऱ्यांनी याबाबत आश्वासने दिली. परंतु आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे.
नवनाथ दुरंदे,राजुरी