करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तहसिल कडुन भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा

करमाळा समाचार

भटक्या जातीतील नागरीकांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक भटक्या जातीतील जो वेळ देऊ शकेल अशा सदस्यांनी नाव नोंदणी करून समिती लवकरात लवकर गठन करावी असे आवाहन तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे. रविवारे दि ३१ ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सर्व भटक्या विमुक्त जमातीचे प्रमुख हजर होते. या कार्यक्रमांमध्ये पोलिस निरिक्षक रणजीत माने, प्रा. रामकृष्ण माने, निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे, नायब तहसीलदार विजय जाधव पुरवठा नायब तहसीलदार शत्रुघ्न चव्हाण हे हजर होते.

या कार्यक्रमांमध्ये भटक्या विमुक्त जातीचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता दर महिन्याला एक मीटिंग ठेवण्यात येईल आणि या मीटिंगसाठी एक समिती गठित करण्यात येईल असे ठरले, सदर कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या भटक्या जमातीच्या लोकांनी आपली मनोगत यांनी समस्या मांडल्या. या कार्यक्रमांमध्ये ३० जातीचे दाखले, २७ संजय गांधी पेन्शन पत्र, ३० रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE