करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याचा दहावी निकाल ९३.७० टक्के ;  तेवीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के

करमाळा समाचार 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. करमाळा तालुक्यातील एकूण ५६ विद्यालयांतील विद्यार्थ्यांची सरासरी उत्तीर्ण टक्केवारी ९३.७० टक्के इतकी घोषित झाली आहे. एकूण २३ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

सदर परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ३ हजार १०५ परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. त्यापैकी ३ हजार ६७ जणांनी परीक्षा दिली. निकालामधून ९३१ जणांना विशेष गुणवत्ता, ९७८ जणांना श्रेणी एक, ७२१ जणांना श्रेणी दोन, २४४ जणांना पास श्रेणी प्राप्त झाली असून एकूण पास परीक्षार्थींची संख्या २ हजार ८७४ इतकी आहे. दरम्यान १ हजार ७०३ पैकी १ हजार ५५२ विद्यार्थी तर १ हजार ३६४ पैकी १ हजार ३२२ विद्यार्थीनी पास झाल्या असून
मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९१.१३ तर मुलींची ९६.९२ टक्के इतकी असल्याने निकालात मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

politics

तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वांगी, श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा, राजेश्वर विद्यालय राजुरी, नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे, न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर एक, शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे, शारदाताई पवार विद्यालय केम, अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे, छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे, डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे, वामनदादा बदे माध्यमिक विद्यालय उमरड, प्रगती विद्यालय मांगी, त्रिमुर्ती विद्यालय टाकळी, महात्मा ज्योतीराव फुले विद्यालय मोरवड, माध्यमिक विद्यालय पांडे, दत्तकला आयडीयल स्कूल केत्तूर नंबर एक, अभिनव माध्यमिक विद्यालय वाशिंबे, नवभारत इंग्लिश स्कूल, नोबेल इंग्लिश मेडिअम स्कूल, डी. जी. पाटील स्कूल करमाळा, गुरुकुल माध्यमिक विद्यालय पांडे, कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल, स्व. नामदेवराव जगताप नगरपरिषद उर्दू शाळा करमाळा या २३ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

ऑनलाईन पध्दतीने घोषित झालेल्या निकालानुसार तालुक्यातील इतर विद्यालयांतील परिक्षार्थी व पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

महात्मा गांधी विद्यालय करमाळा ९१.२० टक्के, भारत हायस्कूल जेऊर ९४.२७ टक्के, उत्तरेश्वर विद्यालय केम ९१.२२ टक्के, साडे हायस्कूल साडे ९४.५६ टक्के, नेताजी सुभाष विद्यालय केतूर दोन ९६.१५ टक्के, छत्रपती शिवाजी विद्यालय कोर्टी ९५.२३ टक्के, कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा ९२.४५ टक्के, लालबहादूर शास्त्री विद्यालय सालसे ८९.५८ टक्के, छत्रपती शिवाजी विद्यालय वीट ८५.४८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल चिखलठाण ९३.६८ टक्के, श्री शहाजीराव भोसले हायस्कूल जिंती ९५.४५ टक्के, राजाभाऊ तळेकर विद्यालय केम ८५.७१ टक्के, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय रायगाव ९०.३२ टक्के, सरस्वती विद्यालय वरकुटे ८० टक्के, कण्वमुनी विद्यालय कंदर ७३.४३ टक्के, कमलादेवी कन्या प्रशाला करमाळा ९२.९५ टक्के, एम.एन.विद्यालय संतोषनगर जेऊर ८६.२० टक्के, शरदचंद्र पवार विद्यालय, कुंभारगाव ९५.१२ टक्के, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय जातेगाव ९२.६८ टक्के, श्री सिध्देश्वर विद्यालय हिसरे ८९.४७ टक्के, नूतन माध्यमिक विद्यालय केम ८०.९५ टक्के, आदिनाथ माध्यमिक विद्यालय आदिनाथनगर ९६.८७ टक्के, विठामाई माध्यमिक विद्यालय गुळसडी ९०.२४ टक्के, धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ९५.७४ टक्के, गिरधरदास देवी विद्यालय करमाळा ९३.१० टक्के, भिलारवाडी माध्यमिक विद्यालय भिलारवाडी ९४.७३ टक्के, श्री दिगंबरराव बागल विद्यालय सावडी ८७.५० टक्के, दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज ९७.७२ टक्के, श्री अवधूत विद्यालय वांगी नंबर दोन ९६.६६ टक्के, आर. जी. गाडेकर माध्यमिक विद्यालय पोथरे ९६.२९ टक्के, माध्यमिक विद्यालय विहाळ ५० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल घोटी ९५.३४ टक्के.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE