उजनीच्या पाण्यावरुन करमाळ्याचे राजकारण तापले ; आ. संजयमामाच्या भुमीकेवर प्रश्नचिन्ह
करमाळा समाचार
इंदापूर भागात पाच टीएमसी पाणी सोडल्यानंतर आता करमाळा तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अतुल खूपसे यांच्या आंदोलनानंतर आता दिग्विजय बागल यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलत असताना लोकप्रतिनिधी आमदार संजय मामा शिंदे यांनी विरोध कसा केला नाही यावरून त्यांनी त्यांच्या भूमिका वरील प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावेळी बोलत असताना दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे उजनीच्या पाणी बाबतीत भेट घेऊन बाजू मांडण्याचे सांगितला आहे. तर इतक्या दिवसांपासून याचं नियोजन सुरू असतानाही तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी याकडे लक्ष दिले नाही. याचेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

तालुक्यातील उजनी बॅकवॉटर भागातील लोकांनी आपल्या जमिनी देऊन बलिदान दिले असताना पहिल्यांदा करमाळा तालुक्यातील पाणी वाटपाला प्राधान्य दिले पाहिजे. वास्तविक पाहता सांडपाण्यातून ते पाणी सोडले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आला आहे. तो निर्णय अतिशय चुकीचा आहे असेही बागल यांनी सांगितले. तर पाण्याचा एकही थेंब बाहेर जाऊन जाणार नाही यासाठी मोठा लढा आम्ही उभा करू असे इशाराही यावेळी बागल यांनी दिला आहे.
तर यापूर्वीही ज्या ज्या वेळी आंदोलने करण्याची वेळ आली. त्यावेळेस बागल गटाने बाजू मांडत वीज तसेच पाण्याचे नियोजन केले होते व त्या मागण्याही आंदोलन करुन मांडण्यात आल्या होत्या असे सांगत असताना पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.